१३ वर्षीय बेपत्ता झालेला बालक ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजे दरम्यान शेगाव रेल्वे स्टेशनवर ड्युटीवर असतांना आरपीएफ रंजन तेलंग यांना रेल्वे स्टेशन परिसरात रडत असताना दिसून आला यावेळी तेलंग यांनी त्याची विचारपूस केली असता तो इंदौर येथील रहिवासी असल्याचे समजले .त्या बालकाला विश्वासात घेत आरपीएफ पोलीस रंजन तेलंग यांनी इंदोर येथे पोलीस स्टेशनमध्ये संपर्क केला तेव्हा हा बालक बेपत्ता झाल्याने त्याच्या आईवडिलांनी हिरानगर पोलीस स्टेशन ला गुन्हा क्र 0465/2025 कलम 137 BNS नुसार दाखल असल्याचे समजले.