भंडारा जिल्ह्यासह लगतच्या मध्यप्रदेश राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मध्यप्रदेश राज्यातील संजय सरोवरचे 2 दरवाजे उघडण्यात आले असून त्यामधून 445 क्युमेक पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीत सोडण्यात येत आहे व गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आले असून त्यामधून 77 क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, धापेवाडा धरणाचे 17 दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून 2542 क्युमेक पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. परिणामी कारधा येथील वैनगंगा नदीच्या पाणी...