बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील नंदागौळ येथील रहिवासी असलेल्या एका २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. केज येथील एका शैक्षणिक संस्थेत अनुकंप तत्त्वावर हा तरुण पूर्वी कार्यरत होता. याच संस्थेतील संस्थाचालकांनी त्रास दिल्याच्या कारणावरून संबंधित तरुणानं हे टोकाचं पाऊल उचललं अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, परळी तालुक्यातील नंदागौळ येथील रहिवासी श्रीनाथ गोविंद कराड (वय २५) याने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.