सेनगांव तालुक्यात आज विविध परीसरात मुसळधार पाऊस कोसळला असून त्यामुळे अनेक शेतामध्ये पाणी साचून शेतीला तळ्याचे स्वरूप आले होते. मागील आठवड्यात सेनगांव तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता त्यातच पुन्हा आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुपारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास नागा सिनगी सह अनेक परिसरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने पिकामध्ये पाणी शिरून पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.