शेतामध्ये असलेल्या बोरिंग मध्ये टाकलेली मोटर पंप व वायर असा एकूण २५ हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना पारखेड शिवारात २७ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजे दरम्यान उघडकीस आली आहे.याबाबत प्रदिप भगवान सातव वय 52 वर्ष रा. सुटाळा बु यांनी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली की,पारखेड शिवारात शेतातील बोरिंग मध्ये टाकलेली मोटार पंप व त्याला लावलेला वायर असा ऐकून 25 हजार रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने लंपास केला.