आज दिनांक 28 ऑगस्टला पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीतील पाळा ते शिरजगाव रोडवरील शिरजगाव स्मशानभूमी जवळ दिनांक 26 ऑगस्टला दुपारी दोन वाजता शिरजगाव पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुकीवर कारवाई करून कत्तलीसाठी जाणाऱ्या तीन गोवंशयांना ताब्यात घेऊन सरफराज व बबलू जावरकर नावाच्या इस्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे