मेळघाटातील नरभक्षी वाघाबाबत आज दुपारी ३ वाजता मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली.या बैठकीत आ.रवि राणा व मेळघाट क्षेत्राचे आ.केवळराम काळे यांनी उपस्थितीत राहून नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली. यावेळी आ.रवि राणा व आ.काळे यांच्या उपस्थितीत मंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाचे निर्णय घेण्यात आले.यामध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना तात्काळ अनुकंपा तत्त्वावर शासन सेवेत सामावून घेण्याचे आदेश देण्यात आले.