लातूर:– जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी, जनावर चोरी तसेच साखर कारखान्यातील गन मेटल चोरीच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी विशेष आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत मुरुड येथील बायपास रोड वरून दोन आरोपींना ताब्यात घेऊन तब्बल 15 लाख 82 हजार 456 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईतून तब्बल 18 गुन्ह्यांची उकल झाली.