जिल्ह्यात संततधार पावसामुळे तसेच सोयाबीन वर आलेल्या यलो मोझॅक आणि चारकोल रॉट या रोगांमुळे पिकांचे उत्पादन धोक्यात आले आहे.शेतकऱ्यांनी करपलेले, पिवळे पडलेले व शेंगांविना राहिलेले सोयाबीन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर तसेच कृषी विभाग कार्यालय येथे धडक दिली. जर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर नेपाळ सारखी परिस्थिती वर्ध्यात होणार यात शंका नाही.