शिरोळ तालुक्यातील घालवाड येथील नवजीवन तरुण मंडळाने यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी,बँजो अशा गोंगाट करणाऱ्या आधुनिक वाद्यांना फाटा देत पारंपरिक वारकरी पंथाच्या गजरात शनिवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता विसर्जन मिरवणूक काढून एक वेगळा आदर्श घालून दिला.१९८० साली स्थापन झालेल्या नवजीवन मंडळाने यापूर्वी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण,सामाजिक प्रबोधन यासारख्या उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी जपली आहे.