शरणपूर रोड, बेथेल नगर येथे हद्दपार गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ताब्यात घेऊन सरकार वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.अंबादास बाळू दांडेकर राहणार लेखा नगर, इंदिरा गांधी वसाहत, सिडको याला परिमंडळ दोन उपायुक्त किशोर काळे यांच्या आदेशाने नाशिक शहर व ग्रामीण भागातून एक वर्षाकरिता हद्दपार केलेले असतानाही कुठलीही परवानगी न घेता बेथेल नगर शरणपूर रोड येथे फिरताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.