शहराला शनिवारी जोरदार पावसाने झोडपुन काढले,या वादळी पावसामुळे शहरातील श्रीराम नगर भागात विद्युत तारा तुटल्याने शॉक लागून दोन बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यावर्षी पावसामुळे आधीच शेतीपिकांचे नुकसान झाले असताना आता नागरी भागात देखील पावसामुळे नुकसानीच्या घटना घडत आहेत.आजच्या वादळी पावसामुळे पशुपालकाचे नुकसान झालेले तर विजेच्या तारा तुटल्यावर या ठिकाणी महावितरण कर्मचारी पोहोचण्यास विलंब झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.