हातकणंगले तालुक्यातील चोकाक परिसरात अवैधरीत्या तीन पत्त्यांचा जुगार खेळत असलेल्या चौघांवर हातकणंगले पोलिसांनी रविवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास केले असल्याची माहिती आज सोमवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता हातकणंगले पोलीस ठाण्यातून मिळाली.याबाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल राहुल टोणपे यांनी हातकणंगले पोलिसात दिली आहे.याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की चोकाक येथे तीन पाणी जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती हातकणंगले पोलिसांना मिळाली.