हदगाव तालुक्यातील वरवट ते मनाठा रोडवर शेख फरिद बाबा दर्गा समोर सार्वजनिक रोडवर दि ६ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास यातील मयत कांताबाई कचरू वाठोरे वय ४० वर्षे ह्या आरोपी प्रकाश वाठोरे याच्या मोटारसायकल वर बसुन येत असताना उपरोक्त घटना घडली आणि आरोपी मयतास दवाखान्यात न नेता तसाच निघून गेला. याप्रकरणी फिर्यादी गुंजन नरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सायंकाळी मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंगोले आज करीत आहेत.