नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे दुधड येथे दि ८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री आठ ते दि ९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी आठच्या दरम्यान यातील मयत अन्नपुर्णा कोंडीबाराव शिंदे वय ५० वर्षे यांचा यातील आरोपी सुनील हातमोडे वय ३० वर्षे याने अनैतिक संबंधातून खुन केला. याप्रकरणी फिर्यादी मोतीराम शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात आज दुपारी गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.