लातूर : शहरातला एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राम गल्ली येथील तीन महिन्याचे बाळ यथार्थ सुधांशु जोशी हा चिमुकला आपल्या लाडक्या गणपती बाप्पासोबत जणू खेळताना दिसत आहे. बाप्पाच्या समोर हातवारे करत गोंडस बाळाचे हावभाव पाहून सर्वच भाविक मंत्रमुग्ध झाले आहेत. भक्तीभाव आणि निरागसतेचा सुंदर संगम म्हणून हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे.,लातूरकरांच्या बाप्पावरच्या प्रेमात आता एका बाळाच्या निरागस हसण्याची आणि खेळण्याची भर पडली आहे.