तुमसर शहरातील नेहरू ग्राउंड येथे दि. 24 ऑगस्टला तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आ. राजू कारेमोरे व मित्र परिवारांच्या वतीने दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान कार्यक्रमानंतर डीजेच्या आवाजात बेधुंद नाचणाऱ्या तरुणांना पाहून आ. राजू कारेमोरे यांना देखील डान्स करण्याचा मोह आवरता आले नाही आणि त्यांनी देखील ठेका धरत डान्स केला. यावेळी आ. राजू कारेमोरे यांचा डान्सचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.