स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथील पथक दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना आरोपी अनमोल विजय धारगावे वय 42 वर्षे रा. लाला लजपतराय वार्ड भंडारा हा बेला येथे कान्हा नगरीमध्ये जाणाऱ्या रोडवर सार्वजनिक ठिकाणी चिलममध्ये अमली पदार्थाचे सेवन करताना मिळून आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याची एनडीपीएस अॅक्ट प्रमाणे अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक चिलम, एक माचिस डबी व एक सुती कापडाच्या तुकडा मिळून आला. सदर आरोपीचे कृत्य हे कलम 27 एनडीपीएस ॲक्ट...