पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाघोली येथील केअर हॉस्पिटल समोरील रिक्षा स्टॉप ते टोयोटा गोडाऊन असा रिक्षाने प्रवास करीत असताना रिक्षामध्ये बसलेल्या अनोळखी महिलांनी उलटी आल्याचा बहाणा करून प्रवासी महिलेच्या अंगावर पडून गळ्यातील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली. महिलेला चोरीची कल्पना घरी आल्यावर आल्यावर आली. पोलिसात धाव घेतली.वाघोली येथील ५६ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार रिक्षा चालक व दोन अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.