बर्डे प्लॉटमध्ये दोन कुटुंबात क्षुल्लक वादातून वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना ९ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजे दरम्यान उघडकीस आली आहे.या हाणामारीत दोन जण जखमी झाले आहेत. तर परस्पर विरोधी तक्रारीवरुन ८ जणांविरुध्द शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.बर्डे प्लॉट भागातील यास्मीनबी मोहम्मद अनिस बेग यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अमीन लाला चौधरी,मोईन अमीन चौधरी, सोहेल अमीन चौधरी,लुकमान कन्हैया पटेल या ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.