वर्ध्यात जिल्हा परिषद समोर सुरू असलेल्या एन एच एम च्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज महादेव पुरा येथील सार्वजनिक गणेश मंडळ येथे दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास जाऊन थेट गणपती बाप्पालाच निवेदन देत मागण्या पूर्ण करण्याबाबत साकडे घातले आहे.गणपती पूजन करून शासनाचे लक्ष वेधले आहे. जानेवारी महिन्यापासून अनियमित वेतन केले जात आहे. पगार वाढ, समायोजन, समान काम समान वेतन याशिवाय 14 मार्च 2024 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या.