मुसळधार पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या पुरस्थितीत धारुर तालुक्यातील आवरगाव शिवारात वाण नदीवर भीषण दुर्घटना घडली होती. ही घटना घडली. धारुर तालुक्यातील अनिल बाबुराव लोखंडे (वय ३२) हे आपली रिक्षा घेऊन अंबाजोगाईहून धारुरकडे परतत होते. मात्र, आवरगाव येथील वाण नदीच्या पुलावरून प्रचंड वेगाने पाणी वाहत होते. रात्रीच्या अंधारामुळे आणि पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांची रिक्षा थेट पुराच्या प्रवाहात वाहून गेली. अखेर तीन दिवसानंतर मृतदेह प्रशासनाने शोधून काढला