गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या एका २१ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना वझर येथील तलाव येथे ७ सप्टेंबर रोजी रात्री ३ वाजे दरम्यान उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की खामगाव तालुक्यातील वझर येथील तलाव येथे गणेश विसर्जन करण्यासाठी आलेल्या वझर येथील पवन गणेश मोहीते वय २१ वर्ष हा तलावामध्ये बुडत असताना नागरिकांना दिसून आला.यावेळी नागरिकांनी तसेच एस डी आर एफ यांच्या टीमने लगेच त्याला बाहेर काढले.