तापमानवाढीमुळे निसर्गाचा लहरीपणा वाढलेला असून शेतकऱ्यांनी सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींसाठी मानसिकता तयार ठेवावी आणि सरकारवर अवलंबून राहू नये," असा सल्ला शेतकरी नेते पाशा पटेल यांनी दिल्यानंतर या वक्तव्यावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.पाशा पटेल हे शरद जोशींच्या शाळेत तयार झालेले शेतकरी नेते असूनही आज त्यांच्या तोंडून सरकार बोलताना दिसत आहे.हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असून शेतकऱ्यांना आयात-निर्यातीच्या धोरणातून, विविध करांमधून लुटले जाते.