लातूर -मराठा आरक्षणाच्या लढ्यात आत्माहुती देणारे शहीद शिवश्री विजयकुमार घोगरे यांचे पार्थिव आज दि. 31 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता अहमदपूर येथे दाखल झाले असून अहमदपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्वसामान्यांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. सहकाऱ्यांसाठी लढणाऱ्या व समाजाच्या हक्कासाठी बलिदान दिलेल्या या तरुण दिग्गजाला पाहण्यासाठी शहर व परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते तसेच मोठ्या संख्येने युवक वर्गाने उपस्थिती लावली.अंत्यदर्शनावेळी चौकात शोककळा दाटून आली.