घरोघरी टपाल वाटप करून भाजपच्या उमेदवाराविरुद्ध अपप्रचार करणाऱ्या तरुणांना भाजप कार्यकर्त्यांकडून सोप देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची घटना बंबलवाड येथे आज शनिवारी रात्री 10 च्या सुमारास घडली आहे.घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी की बंबलवाड गावात काही युवक व युवती नागरिकांना टपाल देत होते या टपालावर आम्ही मीडिया समूहाकडून सर्वे केला असून भाजपचे उमेदवार पराभूत झाले आहेत तसेच काँग्रेसचा उमेदवार विजयी झाले असल्याचा मजकूर टपालावर छापण्यात आला आहे.