वस्त्र नगरी म्हणून ओळखले जाणारे इचलकरंजी शहर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक उत्साहाने न्हालं आहे.मंगळवार पासून घरगुती गणपतींचे वाजत गाजत, पारंपरिक वाद्यांच्या गजरात विसर्जन करण्यात आले.बालचिमुकले,महिला आणि गणेशभक्तांनी भावपूर्ण निरोप देताना डोळ्यांत अश्रूंना आवर घालू शकले नाहीत.शहरातील पंचगंगा नदी, विहिरी,शहापूर खण व महानगरपालिकेच्या कृत्रिम कुंडांमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्जन झाले.यंदा गणेशभक्तांनी घरी सात दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केली.