आज दि. 27 ऑगस्ट रोजी दुपारी 4 च्या सुमारास धर्माबाद तालुक्यातील विविध गावातील शेकडोच्या संख्येने धर्माबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत मुंबईच्या दिशेने कूच केले असून यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणते देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही.. अशी नारेबाजी करत सकल मराठा बांधव हे मुंबईकडे रवाना झाले आहेत. आरक्षण दिल्या शिवाय माघार नाहीच असा पवित्रा ह्या समाज बांधवानी यावेळी घेतले आहेत.