सुंदर,निसर्गरम्य वातावरण असलेल्या खामगाव शहरापासून हाकेच्या अंतरावर जनुना तलावाचे रुपडे पलटले असून, एक कोटी रुपये खर्चुन जनुना तलावात श्रीगणेश घाट साकारण्यात आला आहे. राज्याचे कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांच्या संकल्पनेतून या घाटाचे निर्माण झाले असून, मंडळांना मूर्ती विसर्जनासाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.इंग्रज काळात जनुना तलावाची निर्मिती झाली आहे. जवळपास १४० वर्ष जुना असलेला हा तलाव नगरपालिकेच्या मालकीचा आहे.