चांगदेव या गावात महादेव मंदिर आहे.या मंदिराच्या जवळ वॉटर सप्लाय विहीर आहे या विहिरीच्या मागे असलेल्या तापी नदी पात्रात एक अनोळखी ४० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस त्या ठिकाणी गेले पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे आणण्यात आला व ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तर याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.