तुमसर तालुक्यातील गोबरवाही प्राथमिक केंद्राची इमारत जीर्ण झाली आहे तर प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवा रखडली असून प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 28 गावातील नागरिकांना उपचार मिळत नाही. यातच परिसरातील महिलांना प्रसूतीसाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. या गंभीर समस्येची दखल घेत पं.स. सदस्य नरेंद्र गेडाम यांनी आज दि. 12 सप्टेंबर रोज शुक्रवारला दुपारी 4 वा. संबंधित आरोग्य सेवा विभागाला कळविला असून आरोग्य सेवा रखडल्याचा आरोप केला आहे.