गेवराई तालुक्यातील फुलसांगवी फाट्यावर लक्ष्मण हाके यांचे छायाचित्र लावलेल्या फलकावर अज्ञातांकडून काळी शाई फेकण्यात आल्या प्रकार समोर आला आहे. १२ सप्टेंबर रोजी शिंगारवाडी फाट्यावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र अज्ञात व्यक्तीने बॅनर वर काळी फासले त्यानंतर आक्रमक झालेल्या ओबीसी समाजाने तेथे जाऊन बॅनरला दुग्धाभिषेक घालून निषेध व्यक्त केला.