किसन नगर येथे 40वर्षे जुने बांधकाम असलेल्या तिवारी सदन या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर घराचा स्लॅब कोसळण्याची घटना घडली.माहिती मिळतात सर्व टीम घटनास्थळी दाखल झाल्या.इमारतीचे पाहणी केली असता सदरची इमारत धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर इमारत कोसळून कोणतीही दुर्घटना करू नये यासाठी तातडीने इमारत रिकामी करून सतरा कुटुंबीयांचे स्थलांतर केले आणि इमारतीला धोकापट्टी लावून बेरीगेटिंग करण्यात आले. सुदैवाने जीवित हानी नाही मात्र सणासुदीच्या घर सोडावे लागल्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.