एखाद्या संस्थेला सेवा देतांना कर्मचा-यांचे अर्धे आयुष्य खर्ची पडते. विद्यापीठातून सेवानिवृत्त होत असलेले कर्मचारी देखील असेच आपले अर्धे आयुष्य देत आले आहेत व त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचे सुध्दा विद्यापीठाच्या वाटचालीत निश्चितच योगदान आहे, असे उद्गार कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी काढले. आज ३० ऑगस्ट शनिवार रोजी दुपारी चार वाजता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते...