१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दुचाकी चालविण्यास देऊ नका असे आव्हान वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. अल्पवयीन लहान मुलांनी वाहन चालवीने ज्यांचे जवळ लायसेन्स नाही अशा ५२ विद्यार्थ्यांंवर वाहतूक पोलिसांनी मोटार वाहन कायदा कलम 4(1)/181 कलमनवये कायदेशीर कार्यवाही करून ५३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, वाहतूक नियम पालन करावे याबाबत जनजागृती करण्यात आली आहे, तरी यांनतर अपघात होऊ नये याकरिता मोहीम राबवून कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.