दरवर्षीप्रमाणे औंढा नागनाथ ते शेगाव जाणारी पायदळ दिंडी यावर्षी दिनांक ४ सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजेदरम्यान औंढा नागनाथ शहरातील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर येथून शेगाव कडे रवाना झाली आहे शहरातील दिंडी मार्गावर स्वागतासाठी अनेक ठिकाणी रांगोळ्या रेखाटल्या होत्या मजल दरमजल करत ही दिंडी ९ सप्टेंबर रोजी शेगाव येथे पोहोचणार आहे या दिंडी सोहळ्यात ८० संत श्री गजानन भक्ताचा समावेश आहे.तत्पूर्वी श्री गणपतीची व सजवलेल्या रथातील संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेची आरती करण्यात आली.