एका हॉटेलमध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला.यामध्ये तब्बल तेरा जुगारांना रंगेहात अटक करण्यात आली तसेच त्यांच्याकडून 14 मोबाईल एक कार जुगार साहित्य व रोख असा एकूण नऊ लाख 51 हजार 404 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई 31 ऑगस्ट रोजी पाटणबोरी येथील शिवशक्ती हॉटेलमध्ये पांढरकवडा पोलिसांनी केली आहे.