भिवंडी परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडले असून यामध्ये एका डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. अन्सारी नावाचे 58 वर्षीय डॉक्टर दुचाकीवरून जात होते. त्यांच्या शेजारून एक ट्रक जात होता ते जात असताना त्यांचा तोल गेला आणि त्यांची ते रस्त्यावर पडले.तेवढ्यात बाजूने जात असलेल्या ट्रकचे त्यांच्या डोक्यावरून गेल्याने चिरडले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना भिवंडी परिसराच्या वंजारपाटी नाका येथे घडली असून घडलेल्या घटनेचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.