चोपडा तालुक्यात नागलवाडी हे गाव आहे. या गावाच्या पुढे हॉटेल राजपूत आहे या हॉटेलच्या समोरून सेंट्रो कार क्रमांक एम.एच.१९ ए. एक्स.४९१३ द्वारे ईश्वर रोकडे व गोपाळ माळी जात होते. त्यांना एसटी बस क्रमांक एम. एच.१४ बी.टी.१३२४ वरील अज्ञात चालकाने धडक दिली यात ते दोघे जखमी झाले. तेव्हा या अपघात प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.