पन्हाळा येथील सफाई कामगार मनीषा दिलीप सोरटे यांना त्यांच्या कामाच्या दरम्यान जातीवाचक हिणवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी खाजगी ठेकेदार सुरज पाटील यांच्यावर पन्हाळा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी) अंतर्गत शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज शनिवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता पन्हाळा पोलिसातून मिळाली.