जळगाव शहरात आर्यन पार्क येथील गिरणा नदीपात्रात गणपती विसर्जनादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. वाघ नगर येथे राहणारा राहुल रतिलाल सोनार हा तरुण आपल्या मित्रासोबत विसर्जनासाठी नदीत उतरला असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो प्रवाहात वाहून गेला. राहुलसोबत असलेल्या विश्वनाथ पाटील याला एका नागरिकाच्या मदतीने वाचवण्यात यश आले, मात्र राहुलचा शोध लागलेला नाही. आज दिनांक सात सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली