सोमानी गार्डन समोरील हॉटेल किरण येथे धारदार शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागितल्या प्रकरणी चार जणांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुक्तिधाम सोमानी गार्डन समोर, हॉटेल किरण येथून दिनेश दिलीप दासवानी हे हॉटेल बंद करून घरी जात असताना रीक्षेतून आलेल्या चार जणांनी धारदार लोखंडी शस्त्र दाखवून वाईट साईट शिवीगाळ केली. तसेच दहा हजारांचा हप्ता मागितला. दिनेश दिलीप दासवानी यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार केली आहे.