डोंबिवली परिसरातील छेडा रोड येथे एक सायंकाळच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. केडीएमसीमनपा च्या पथदिवे दुरुस्ती करण्यासाठी ठेकेदाराच्या आलेल्या गाडीने रस्त्याने चालत असलेल्या वृद्ध महिलेला चिरडल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून सीसीटीव्ही व्हिडिओ पाहून संताप व्यक्त केला जात आहे.