पुसद तालुक्यातील रोहडा येथील आरोपी संतोष किसन कानडे यांनी त्याच्या शेजारी मारुती पोपळघट यांच्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आरोपी विरुद्ध भादवीचे कलम ३०७ नुसार जन्मठेप व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.जे रामकगडिया यांनी सुनावली आहे.