चिखलीचे भूषण, जलपुरुष स्व. भारतभाऊ बोंद्रे यांना विधीमंडळाच्या वतीने आदरांजली! चिखलीचे भूषण, माजी आमदार तथा महाराष्ट्राचे पाटबंधारे मंत्री, उद्योग मंत्री व शिक्षण मंत्री म्हणून भरीव कार्य करणारे स्व. भारतभाऊ बोंद्रे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष मा. श्री. राहुलजी नाॅर्वेकर यांनी शोकप्रस्ताव मांडून स्व. भाऊंच्या देदीप्यमान कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला आणि सभागृहाच्या वतीने स्व. भारतभाऊंना आदरांजली अर्पण केली.