शहरातील गौशाला वार्ड परिसरातील शिव मंदिर पिंडकेपार येथे तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घटना दिनांक ३ जुलै रोजी रात्री दहा वाजता समोर आली चंदन शंकर उईके असे मृताचे नाव आहे रात्री दहा वाजताच्या सुमारास मृत चंदन उईके याने स्वतःच्या राहत्या घरी बांबूच्या आड्याला गमछेने गळफास घेतला गळफास घेतल्याचे लक्षात येताच कुटुंबीय व शेजाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धावले परंतु तोपर्यंत त्याच्या मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.