मेहकर: बेराळा फाट्यालगत कारचा अपघात मेहेकर येथील डॉक्टर ठार
चिखली-देऊळगाव राजा मार्गावरील भानखेड फाटा व बेराळा फाटा दरम्यानच्या वळणावर ४ डिसेंबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात मेहकर येथील सुप्रसिद्ध ऋषीकृपा सोनोग्राफी सेंटरचे डॉक्टर ऋषिकांत उर्फ बंटी रमेश काटे (वय ३८) यांचा जागीच मृत्यू झाला. एक्स यूव्ही-७०० (एमएच २८ डब्ल्यू ९३९४) ही कार सुमारे ७० ते ८० फूट शेतात शिरली. धक्क्याने डॉ. काटे शेतात पडले, तर गाडी परत रस्त्यावर आली.