मागील काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात बिबट्या आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यातल्या काही खोट्या तर काही चर्चा खरं आहेत. अशीच चर्चा खराडी परिसरातही रंगली. चक्क पोलिसांनाच फोन करून खराडी परिसरात बिबट्या दिसण्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी नागरिकांना आवाहन करताना बिबट्या दिसला तर आम्हाला कळवा असं म्हणत जनजागृतीही केली.