अमोना येथील प्रतिष्ठित नागरिक, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असलेले मधुकर नामदेव वाघ यांच्या शेतातील मक्याची गंजी (सुडी) जळक्यानि पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीच्या शेताचे नुकसान केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.