पाथर्डी-शेवगावमधील रिलस्टार असलेली महिला बसमध्ये प्रवाश्यांच्या पर्स चोरायची ही बाब आज (ता. ३) समोर आली.पाथर्डी-कल्याण बसमध्ये प्रवास करत असलेल्या महिलेची पर्स चोरीला गेली. या संदर्भात महिलेने पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास करत बंटी-बबलीची जोडी गजाआड केली.